यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज ग्रामीण भागातील जुन्या-जाणत्या वयोवृद्धांनी व्यक्त केला आहे.

झाडावरील कावळ्याने बनविलेल्या घरट्याच्या उंचीवरून त्यांनी हा अंदाज बांधला असून त्यांचा हा पारंपरिक ठोकताळा अगदी अचूक ठरल्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचे संकेत निसर्ग माणसाला देत असतो. परंतु ते बघण्याची नजर माणसांकडे असायला हवी. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टींवर व घडामोडींवर जुने लोक नजर ठेवत असत.

जुन्या काळी विज्ञान एवढे प्रगत नसताना पावसाचा अचूक अंदाज शेतकरी लावत असे. तसाच एक अंदाज यंदा किती पाऊस होईल? हे कावळ्याने बांधलेल्या घरट्यावरून खुडसरगाव येथील एका ज्येष्ठ वयोवृद्धाने सांगितला.

कावळ्याने जर आपले घरटे झाडाच्या शेंड्यावर बनविले तर भरपूर पाऊस होणार, जर घरटे झाडाच्या मध्यावर बनविले तर सरासरीत फारच कमी पाऊस होणार आणि कुठेच घरटे आढळले नाही तर हे दुष्काळाचे संकेत असतात. अशी माहिती एका अनुभवी ज्येष्ठांनी दिली.

पावसाला सुरूवात केव्हा होईल? हे नक्की सांगता येत नाही. पण प्रतिवर्षाच्या सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस होण्याचे संकेत दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment