कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करा – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करावे, अशी तंबी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे.

नेवासा तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक ना. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी बी-बियाणे, खते, पीक विमासह कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेतला.

बी-बियाणे, खते शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात तसेच निर्धारीत वेळेत व किंमतीत उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी सजग राहण्याची सूचना ना.गडाख यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने पीक विमा ऐच्छिक केला असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच

याबाबत शेतकऱ्यांना जनजागृतीद्वारे माहिती देऊन येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पीक विमा उतरविण्यास उद्युक्त करावे, कारण अवकाळी, अवर्षण तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई मिळत

असल्याकडे त्यांनी यावेळी संबंधितांचे लक्ष वेधले. २०१९च्या खरीप हंगामातील तालुक्यातील १६,८५० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, बाजरी या पिकांच्या नुकसानीपोटी २५ कोटी रुपये तर डाळिंब, पेरू, संत्रा या फळबागांना १ कोटी ९४ लाख रुपये इतकी रक्कम पीक विम्यापोटी मागील महिन्यात शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

ठिबक सिंचन योजनेसाठी तालुक्यातून ११ हजार ९१५ अर्ज प्राप्त झाले असून त्यांना ८० टक्के अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्यासह विविध विभागांचे मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment