अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात पती पत्नी जागीच ठार, कारने दुचाकीस्वारास 150 फुट नेले फरफटत …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-  राहुरी कारखाना – श्रीरामपूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीस्वरास धडक दिल्याने पती पत्नी जागीच ठार झाले हा अपघात आज (गुरवार) दुपारी चार वाजता घडला.

येथील पाटबंधारे कार्यालयासमोर श्रीरामपूरच्या दिशेने जाणारी कार क्रमांक (एम एच 17 बीके 9797) हिने समोरुन येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एम एच 17 ऐजे 6201) हिस समोरुन जोराची धडक दिली,

या दुचाकीवरील भारत शंकर वाघापुरे( वय 50 ,) अनिता भारत वाघापुरे वय( 45  (दोघे रा. देवळाली प्रवरा))  दोघे पती – पत्नी जागीच ठार झाले.  कार ने दुचाकीस्वारास 150 फुट फरफटत नेले.

या अपघातानंतर स्थानिक तरुणांनी पती -पत्नी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापुर्वीच दोघांचे निधन झाल्याचे वैद्यकिय सुञांनी सांगितले.

कारमधील एअर बँग  वेळीच उघडल्यामुळे कार चालक बाबासाहेब लक्ष्मण मुसमाडे यास कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment