विद्यापीठ माध्यम संकुलातील मीडिया स्टुडिओमुळे कुशल पत्रकार घडतील – पालकमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नांदेड, दि. 30 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात  तयार होत असलेला मीडिया स्टुडिओ अत्याधुनिक व आगळावेगळा व्हावा. यामध्ये तांत्रिक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी उद्याच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा विभाग ठरावा अशी अपेक्षा पालकमंत्री  अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 

काल पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना  तपासणी प्रयोगशाळेस भेट देण्यापूर्वी माध्यम संकुलास भेट दिली. या विभागातील मीडिया  स्टुडिओ उभारणीचे  सुरू असलेल्या  कामाची पहाणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव  हंबर्डे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे,  नगरसेवक बालाजी जाधव विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मीडिया स्टुडिओ ची उभारणी, त्यातील उपकरणे, यात अद्ययावत एडिटिंग यंत्रणा, चित्रीकरण कॅमेरा, रेकार्डिग रूम आणि सध्या असलेल्या सुविधा याची माहिती घेतली. या सर्व सुविधांचा लाभ आणि उपयोग विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमात  करिअर  करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे राहील, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी  दिली.

हा स्टुडिओ आगळा-वेगळा व्हावा आणि विद्यापीठाची नवी ओळख होण्यामध्ये स्टुडिओची  भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, यासाठी काही सूचना  कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांना केल्या आहेत.

Leave a Comment