Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

खते, बियाणे बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा

सोलापूर दि. 30 :   खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, महावितरण अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा उप निबंधक कुंदन भोळे, उपसंचालक रवींद्र माने, नाबार्डचे प्रदिप झिले, जिल्हामध्यवर्ती बॅकेचे व्यवस्थापक किसन मोटे  आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सुरवातीला श्री. बिराजदार यांनी खरीप हंगामाचे नियोजन थोडक्यात स्पष्ट केले. बैठकीत उपस्थितांनी प्रामुख्याने खते आणि बियाणे पुरवठा वेळेत व्हावा, वीज  जोडण्या लवकर मिळाव्यात, शेतीच्या नुकसानीची  भरपाई मिळावी, वीज पुरवठा थ्री फेज दाबाने व्हावा, सरकारी आणि खासगी बँकांनी  पीक कर्ज पतपुरवठाचे उद्दिष्ट साध्य करावे, अशा मागण्या केल्या.

या मागण्यांवर सकारात्मक रितीने निर्णय घेण्याची कार्यवाही सर्व संबंधित  अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. त्याचबरोबर काही मागण्यांसाठी  राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना खतांच्या  किमती कळाव्यात यासाठी त्याची प्रसिद्धी करा, बी-बियाणे वेळेत मिळेल याची काळजी घ्या, खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी शेतकरी गटांची मदत घ्या, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना खालीलप्रमाणे :-

खासदार ओमराजे निंबाळकर– पीककर्ज वाटप करण्याबाबत बँकांना सूचना कराव्या.

आमदार प्रशांत परिचारक – थकित कर्जाचे पुर्नगठण करावे. दुधदराबाबत विचार व्हावा.

आमदार सुभाष देशमुख – गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचे प्रस्ताव निकाली काढावे.

आमदार बबनदादा शिंदे– मागील त्याला शेततळे प्रस्ताव मंजूर व्हावाठिबकचे अनुदान मिळावे.

आमदार संजयमामा शिंदे – अवकाळी पावसाची मदत लवकर मिळावी.

आमदार दतात्रय सावंत – स्वतंत्र डी.पी. मिळावी.

आमदार यशवंत माने –  अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.

आमदार सचिन कल्याणशेट्टी – कृषी सोलर पंप पुरवठा करण्यात यावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.