कोरोनाचा जगभर धुमाकूळ, आतापर्यंत घेतला ‘इतक्या’ रुग्णांचा बळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. या प्राणघातक विषाणूने आतापर्यंत जगभरातील २ लाख ३० हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. सद्य:स्थितीत दक्षिण कोरिया व व्हिएतनाममधील स्थिती पूर्णत: नियंत्रणात आली आहे.

तर रशिया व दक्षिण आफ्रिकेतील स्थिती बिघडली आहे. मालदीवमध्येही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. जगभरात कोरोनाचे ३२ लाख ३५ हजार रुग्ण झालेत. यापैकी १० लाख १० हजारांहून अधिक रुग्ण बरे झालेत.

तर जवळपास २० लाख रुग्णांवर इस्पितळांत उपचार सुरू आहेत. यापैकी तब्बल ९७ टक्के रुग्णांत या विषाणूची सौम्य लक्षणे आढळली आहेत. कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक ६१६७० जणांचा बळी गेला आहे.

त्यानंतर इटलीत २७६८२, ब्रिटनमध्ये २६०९७, स्पेनमध्ये २४२७५ तर फ्रान्समधील २४०८७ जणांचा बळी गेला आहे. रशिया व दक्षिण आफ्रिकेतील स्थितीही आता बिघडली आहे.

रशियात गुरुवारी कोरोनाचे ७०९९ नवे रुग्ण आढळल्याने येथील रुग्णांचा आकडा १,०६,४९८ वर पोहोचला. दक्षिण आफ्रिकेतही लॉकडाऊन मागे घेण्यापूर्वी गुरुवारी विक्रमी ३५४ नवे रुग्ण आढळल्यामुळे येथील आकड्याने ५ हजारांचा टप्पा गाठला आहे. मालदीवमध्येही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. येथील २८० नागरिकांना आतापर्यंत या विषाणूची लागण झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment