BreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

महाराष्ट्रात एका दिवसात १००८ कोरोना रुग्ण वाढले ! वाचा तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती …

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  १८७९ रुग्ण बरे झाले आहेत.

आज कोरोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण  ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत

तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका : ७८१२ (२९५)

ठाणे : ५१ (२)

ठाणे मनपा : ४३८ (७)

नवी मुंबई मनपा : १९३ (३)

कल्याण डोंबिवली मनपा : १७९ (३)

उल्हासनगर मनपा : ३

भिवंडी निजामपूर मनपा : १७ (१)

मीरा भाईंदर मनपा : १३५ (२)

पालघर : ४४ (१)

वसई विरार मनपा : १३५ (३)

रायगड : २६ (१)

पनवेल मनपा : ४८ (२)

ठाणे मंडळ एकूण : ९०८१ (३२०)

नाशिक : ६

नाशिक मनपा : ३५

मालेगाव मनपा :  २०१ (१२)

अहमदनगर : २६ (२)

अहमदनगर मनपा : १६

धुळे : ८(२)

धुळे मनपा : १८ (१)

जळगाव : ३४ (११)

जळगाव मनपा : १० (१)

नंदूरबार : ११ (१)

नाशिक मंडळ एकूण : ३६५ (३०)

पुणे :६८ (४)

पुणे मनपा : ११७६ (९२)

पिंपरी चिंचवड मनपा : ७२ (३)

सोलापूर : ७

सोलापूर मनपा : १०१ (६)

सातारा : ३२ (२)

पुणे मंडळ एकूण : १४५६ (१०७)

कोल्हापूर : ९

कोल्हापूर मनपा : ६

सांगली : २९

सांगली मिरज कुपवाड मनपा :१ (१)

सिंधुदुर्ग : २ (१)

रत्नागिरी : ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण : ५५ (३)

औरंगाबाद :२

औरंगाबाद मनपा : १५९ (८)

जालना : ३

हिंगोली : २२

परभणी: १ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: १८९ (९)

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ४

लातूर मंडळ एकूण: २० (२)

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: २७

अमरावती: २

अमरावती मनपा: २६ (७)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १६९ (९)

नागपूर: ६

नागपूर मनपा: १३३ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १४४ (२)

इतर राज्ये: २७ (३)

एकूण:  ११,५०६  (४८५)

( टीप – ही माहिती कोरोना पोर्टलवरील ‘आयसीएमआर’ने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. )

आज राज्यात २६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्गमधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेड मधील १,औरंगाबाद मनपामधील १ तर १ मृत्यू परभणी येथील आहे.

या शिवाय उत्तर  प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर ११  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे.  या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७९२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ८४९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button