Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

पुणे विभागात ३२ हजार ७९१ क्विंटल अन्नधान्याची आवक

पुणे, दि.30 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.

विभागात 2 हजार 418 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 17 हजार 350 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 29 एप्रिल 2020 रोजी 98.47 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.39 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 43 हजार 835 स्थलांतरित मजुरांची सोय

लाख 15 हजार 635 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 159 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 260 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 487 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.

या कॅम्पमध्ये 43 हजार 835 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  15 हजार 635 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.