Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

तुम्ही लॉकडाऊन मध्ये टाईमपास करत होतात तेव्हा अहमदनगरच्या ‘या’ मुलाने लाखो कमाविलेत !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांचे रोजगार – व्यवसाय बुडाले, शेतकर्यांचे तर सर्वात जास्त नुकसान झाले मात्र या कठीण परिस्थितीवर एका तरुणाने मात करत लाखो रुपये कमाविले आहेत…

होय हे खरय.. शेती आणि युवक यांचा समन्वय होत नाही. शेतीपेक्षा आजचा युवक नोकरीला प्राधान्य देतो. मात्र बीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या निघोज येथील मंगेश भिवा लंके यांनी शेतीला प्राधान्य देत शेतीला आधुनिकतेची साथ दिली आहे.

गेली दहा ते अकरा वर्षे शेतीत चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती केली आहे. त्यांचे वडील भिवा लंके व आई गंगूबाई लंके तसेच पत्नी संगीता यांचीही मोलाची मदत त्यांना होत आहे.

मंगेश व संगीता यांचे दोघांचेही शिक्षण बीए असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीला प्राधान्य दिले. ही बाब शेतकर्‍यांच्या मुलांसाठी निच्छीतच अनुकरणीय आहे.

गेली काही दिवसात याच लंके कुटूंबाने दोन एकर शेतीत कलिंगडाचे 70 टन उत्पन्न घेउन साडेतीन लाख रूपयांची निव्वळ कमाई केली आहे.

कलिंगडास साधारण सात रुपये किलोचा भाव मिळाला असून निघोज येथील फळविक्रेते गोरख ढवण व सागर ढवण या पितापुत्रांचे चांगले सहकार्य झाल्याचे ते आवर्जून सांगतात.

मंगेश लंके यांच्या दोन एकर कलिंगड शेतीला एकंदरीत एक लाख चाळीस हजार खर्च झाला असून एकंदरीत 70 टन कलिंगडाचे सात रुपये किलोप्रमाणे चार लाख नव्वद हजार रूपये मिळाले

दरम्यान या साठी खर्च एक लाख चाळीस हजार वजा होता. निव्वळ कमाई फक्त 58 दिवसात साडेतीन लाख रुपये मिळाली आहे.

प्रशासनाकडून वाहतुकीचा परवाना मिळवला व शेकडो शेतकर्‍यांचा माल सुरक्षितपणे मुंबई व उपनगर शहरात सुरक्षीत कसा जाईल व चांगला भाव कसा मिळेल याचा प्रयत्न ढवण पितापुत्रांनी केला.

यामध्ये शेतकर्‍यांनाही बर्‍यापैकी भाव मिळाला. मुंबईकरांनाही योग्य किमतीत कलिंगड मिळाले व व्यवसायिकांना बर्‍यापैकी पैसे मिळाले ही व्यवसायातील त्रिसूत्री साधत सर्व यशस्वी झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.