Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

‘तो’ मुंबईत भाजी विकायला गेला आणि पाथर्डीत कोरोनाचा शिरकाव झाला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे.

दरम्यान, गेल्या ५-६ दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५५९ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४८१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत.

आजच्या बाधीत रुग्णामध्ये आता कोरोना बाधिताची संख्या ४४ झाली आहे. त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे.

त्यापैकी एक जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहे तर ०२ बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही दिवसापूर्वी मोहन देवढे गावातील ही व्यक्ती त्याच्या शेतातील शेतमाल घेऊन मुंबईला गेली होती.

तेथून परतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल त्यांच्या घशातील स्त्राव घेऊन पुण्याला तपासणीसाठी प्पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने तात्काळ तालुका प्रशासनाला आदेश देऊन या बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तीनं शोधून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच गावाचा परिसर सील करून तपासणी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.