‘राज्य उत्पादन शुल्क’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटींची मदत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. 1 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 ‘साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला.

‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या लढ्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 2 हजार 500 अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी 1 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.

या जमा केलेल्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Leave a Comment