Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण

सांगली, दि. 1 : कोविड-19 विरूद्धच्या लढाईत सांगलीकरांनी अत्यंत उत्कृष्ट साथ दिली. याबद्दल सांगलीकरांना धन्यवाद देत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणला, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कोविड-19 विरूद्धच्या लढाईला सर्वोच्च प्राधान्य असून यामध्ये संपूर्ण सांगली जिल्हावासियांनी अत्यंत संयमाने, प्रशासकीय यंत्रणांच्या सूचनांचे पालन करून चांगल्या प्रकारे साथ दिली आहे.

सामान्य माणसांचे जनजीवन पुन्हा सुरळीत व्हावं असा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल व सर्व शासकीय यंत्रणेने अत्यंत चांगले काम केल्यानेच सांगली जिल्ह्यावरील कोरोना संकटाची तीव्रता सौम्य झाली आहे. यामध्ये वाढ होणार नाही असा सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.