आता ‘या’ व्हायरसचा धुमाकूळ; शंभरहून जास्त मुले आयसीयूमध्ये !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोनाव्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा विषाणू प्रौढांवर जास्त परिणाम करतो असे म्हटले जाते. यावर जगभर उपाय शोधण्याचे काम सुरु आहे.

परंतु या दरम्यान युरोपमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्ससह जवळपास 6 देशांमध्ये एक विचित्र विषाणूने मुलांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे.

युरोप आणि अमेरिकेत या नवीन विषाणूमुळे 100 हून अधिक मुलांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. या विषाणूमुळे काही मुलांचा मृत्यूही झाला आहे.

इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कोकने वृत्तसंस्था एजेसी रॉयटर्सला सांगितले की काही मुलांमध्ये विचित्र लक्षणे दिसून येत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

या आजारात मुलांमध्ये छातीत जळजळण्याचा आजार होतो. वैज्ञानिकांनी या विषाणूचा संबंध कोरोनाशी जोडला आहे. यामुळे काही मुलांचा मृत्यूही झाल्याची कबुली आरोग्य सचिवांनी दिली.

इंग्लंडमधील शास्त्रज्ञ म्हणतात की ज्या मुलांना रुग्णालयात आणले गेले आहे. त्यांच्यात टॉक्सिक शॉक सह कावासाकी विषाणूची लक्षणे आहेत. जरी हा विषाणू कावासाकी सारखा असला तरी शास्त्रज्ञांनी त्याची तुलना कोरोनाशी केली आहे.

परंतु शास्त्रज्ञ हे कोरोना विषाणूबरोबरच जोडताना पहात आहेत. शास्त्रज्ञांचा असा संशय आहे की कोरोना विषाणू मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करीत आहे.

प्राप्त अहवालानुसार, युरोपमध्ये आतापर्यंत इंग्लंडशिवाय फ्रान्स, अमेरिका, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंडमध्येही या नवीन विषाणूची शंभराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment