महिलेला ‘त्याची’ मदत घेणे पडले महागात, वाचा काय झाले तिच्यासोबत …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथून तीसगावकडे बँकेचा हप्ता भरण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेला लिप्ट घेणे चांगलेच महागात पडले आहे. लिप्ट देणाऱ्या एका दुचाकीचालकाने महिलेच्या जवळील रोख दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवत लुटले आहेत.

ही घटना बुधवारी घडली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्वत्र प्रवासी वाहतूक बंद आहे.

त्यामुळे तालुक्यातील निवडुंगे येथील शकुंतला रामदास आतकरे(वय-५२,रा.निवडुंगे) या निवडुंगे येथून पायी तीसगाव येथील साई आदर्श मल्टिस्टेट् को-ऑप शाखेत गहाण ठेवलेल्या दागिन्याचा हप्ता भरण्यासाठी निघाल्या होत्या.

यावेळी त्यांनी पायी जात असतांना एका दुचाकी चालकाला हात दाखवून तीसगाव पर्यंत लिप्ट देण्याची मागणी केली. यावेळी दुचाकी चालकाने महिलेला लिप्ट दिल्यानंतर तीसगाव रोडवरील आनंद मार्बलच्या कडेला असलेल्या एका रस्त्यावरील चिंचेच्या झाडाखाली नेऊन चाकूचा धाक दाखवून महिलेकडून रोख दहा हजार रुपयांची रक्कम व आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स काढून घेतले.

त्यानंतर संबंधित चोरट्याने तेथून पळ काढला. याबाबत संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी घटनास्थळी पाथर्डी-शेवगाव-नेवासाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच पुढील तपासाबाबत पाथर्डी पोलिसांना सूचना केल्या.याबाबत पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक परमेश्वर जावळे हे पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment