Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर धडकला कोरोना व्हायरस …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- मुंबई येथे कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांपैकी ७ पोलिस जवान कोरोना संक्रमित आढळून आले आहेत.

प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दौंड शहरासोबतच पाच किमी अंतरावरील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु व गार या दोन गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार महेंद्र महाजन , पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . नितीन खामकर , गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी शनिवारी दुपारी निमगाव खलु व गार ला भेट देत पाहणी केली. राज्य राखीव दलाचे काही जवान मुंबई येथे कर्त्यव्य बजावून आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण आढळून आले.

त्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा प्रशासन उपाय योजना करण्यासाठी अलर्ट झाले असून याबाबत आढावा घेण्यासाठी तहसीलदार महेंद्र महाजन, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी शनिवारी सकाळी निमगाव खलु व गार या गावांना भेट देत पाहणी केली.

यावेळी उपस्थित असलेल्या तलाठी , ग्रामसेवक , आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका ,यांना मार्गदर्शन करत या गावांना आरोग्यसेवा व मदत कशी करता येईल याचा आढावा घेण्यात आला . निमगाव खलु येथील चेक पोस्टवर कडक तपासणी करावी तसेच नागरिकांनी दौंड येथे कोणत्याच कामासाठी जाऊ नये त्याच बरोबर काष्टी , श्रीगोंदा येथील डॉक्टरांनी दौडला कोणत्याही प्रकारचे रुग्ण उपचारा करिता पाठवू नये.अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दौंडचे प्रांताधिकारी प्रशांत गायकवाड यांनी या संदर्भात श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांना लेखी आदेश काढले असून तालुक्यातील निमगाव खलु व गार ही दोन गावे १४ दिवसासाठी लाॅक करण्यात आली आहेत. या गावातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही. बाहेरील नागरिकांना या गावात जाता येणार नाही. तसेच सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, व्यक्ती थेट मदत घेऊन जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.