अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलोविरुद्ध नगरमध्येही गुन्हा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  पोलिस असल्याची तोतयागिरी करणाऱ्या केडगावच्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शबनम मोमीन ऊर्फ समीना गफूर मोमीन (रा. केडगाव देवीमंदिरामागे, केडगाव) हिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता नगरलाही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत माहिती अशी की, शबनम मोमीन उर्फ समीना हिने फेसबुकवर पोलिसांचा गणवेश घातल्याचे फोटो अपलोड केले आहेत.

तिने फेसबुकवरील प्रोफाईलमध्ये महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असल्याचा दावा केला होता.

पोलिस नसताही पोलिस असल्याची तोतयागिरी केल्याने पोलीस कर्मचारी तन्वीर शेख याने शबनम मोमीन हिच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून तिच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 140, 170, 171, 419, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 2000 चे कलम 66 डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment