Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्याला जिवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  दारू अड्ड्याची पोलिसांना माहिती देतो या संशयावरून दोघांनी उंबरे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

लाॅकडाऊनच्या काळात ही घटना घडल्याने उंबरे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. १ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उंबरे परिसरातील माळवाडी येथे ही घटना घडली.

याप्रकरणी शनिवारी राहुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. या फिर्यादीत पंडित यांनी म्हटले, उंबरे गावातून माळवाडी दिशेला जात असताना गावातील अवैध दारू व्यवसायिकांनी

रस्त्यात आडवून आमच्या दारू धंद्याचे लोकेशन पोलिसांना देतो काय, तुझ्या डोळ्यात मिरचीची पूड घालून तुझा काटाच काढतो, अशी दमदाटीची भाषा करत मारहाण केली.

संबंधित अवैध दारू व्यावसायिकाकडून माझ्या जिवाला धोका असल्याने कडक कारवाई करण्याची मागणी पंडित यांनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.