Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

जामखेडमध्ये एकही करोनाबाधित केस राहणार नाही ‘या’ आमदाराचे चॅलेंज

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- जामखेड शहर कोरोना हॉटस्पॉट ठरले. त्यांनतर परिसर सील करण्यात आला होता. यावर बोलताना आ.रोहित पवार म्हणाले, प्रशासनाने जामखेड शहरासाठी चांगले निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे चांगले काम येथे झाले आहे. परिसराच्या बाहेर करोना गेला नाही. आता जामखेडमध्ये एकही करोनाबाधित केस राहणार नाही, अशा उपाययोजना होतील, असे आश्‍वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.

आमदार पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्या दरम्यान ते बोलत होते. जामखेडमधील 17 पैकी 16 व्यक्तींना सर्दी किंवा अन्य कोणती लक्ष नव्हती. तरीही त्यांना शोधले.

185 जणांची तपासणीही करण्यात आली आहे. त्यापैकी सोळा व्यक्ती करोनाबाधित निघाल्या. हे रुग्ण शोधण्याचे महत्त्वाचे काम प्रशासनाने केले आहे.करोनाविषयक चाचण्या करण्यात किंवा आरोग्याच्या विषयात आपण कमी पडलो नाहीत.

त्यापुढे अजून करोनाबाधित वाढू नये, यासाठी आपला प्रयत्न आहे. शासनाच्या मदतीने येथे आपण अत्यावश्‍यक सुविधा देणार आहोत. त्याचे प्रमुख तहसीलदार असतील. येथे आता एक सुद्धा केस राहणार नाही, यासाठी आपला प्रयत्न असेल. असे आ पवार म्हणाले.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा अरोग्य अधिकारी संदीप सांगळे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी सुहास जगताप उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.