Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ खून अनैतिक संबंधातूनच,पोलिसांनी एकास घेतले ताब्यात !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सूत्रांकडून समजले. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, खून करण्याच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरूण शेतकऱ्याचा अतिशय निर्दयपणे खून केला होता.

गुन्हे अन्वेषण विभाग व श्रीगोंदा पोलिसांनी शांतपणे हा गुन्ह्याचा तपास हाताळत

यातील एकास ताब्यात घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.