Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

अहमदनगर क्राईम न्यूज : लग्न केल्याने दोघांवर कोयत्याने वार !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- तालुक्यातील माळेगाव हवेली येथे काळे या आरोपीच्या घरासमोर पूर्वीचे प्रेमसंबंध असतानाही संबंधित तरुणीबरोबर काही महिन्यापूर्वी माळ घालून लग्न केले .

या कारणातून तरुणीला सोडून द्या एकटी राहू द्या , असे धमकावून स्कुटी गाडी घेण्यासाठी आलेला तरुण नितीन सहदेव जगधने , वय २८ , रा . कोतुळ राजवाडा , ता . अकोले , हल्ली रा . समनापूर , ता . संगमनेर याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला .

भावाबरोबर लग्न केलेली तरुण पूनम हिलाही मारहाण करुन दोघांना तुमच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकू , अशी धमकी देवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ केली.

जखमी नितीन जगधने या तरुणाच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे आरोपी पिंट्या उर्फ वेणुनाथ माधव काळे , रा . माळेगाव हवेली , ता संगमनेर , सोमनाथ रामदास खलोटे , रा . आष्टी , जि . बीड यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०७ , ३२६ , ३२४ , ५०४ ५०६ , ३४ प्रमाणे

गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली . पोलीस पुढील तपास करीत आहेत . जखमी तरुणी संगमनेर शहरातील श्रमिकनगर भागातील आहे . काल ९ . ३० वा . ही भयानक घटना घडली .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button