अनैतिक संबंधाच्या वादातून झाली ‘त्याची’ हत्या ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८) या युवकाची गळा, छाती, दोन्हीही हातांचे पंजे आणि गुप्तांगावर धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली.

मुकुंदचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास मुकुंद ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या गट नं. १३३/१ मधील डाळिंब पिकावर फवारणी करण्याकरिता गेला होता.

दहाच्या सुमारास शेतातील पाइपलाइनचा वाॅल्व फिरवण्यासाठी त्याच्या वडिलांनी तीन-चार वेळा फोन केला, मात्र मुकुंदने उचलला नाही. सव्वादहाच्या सुमारास मुकुंदचा चुलत चुलता विजय लहानू वाकडे याने फोनकरून सांगितले की,

मुकुंदच्या गळ्याला तार लागून तो जखमी झाला आहे. आई, वडील व भावाने जाऊन पाहिले असता मुकुंद ट्रॅक्टरजवळ पडला होता. त्याच्या गळ्यावर, तसेच छाती, पंजावर आणि गुप्तांगावर जखमा होत्या.

शवविच्छेदन श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव व निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सातव व जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विठ्ठलराव पाटील करत आहेत.

युवकाचे गुप्तांग कापून टाकले असल्याने हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment