Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthCrime

आता फक्त कपडे फाडले आहे, पुढच्यावेळी उचलून घेवून जाईल असे म्हणत दोन तरुणीचा विनयभंग !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- नगर शहरात कोटला भागात फलटण चौकी भागात राहणाऱ्या एका २५ वर्ष वयाच्या तरुणीस ती मैत्रिणीशी गप्पा मारीत असताना तेथे येवून नज्जू पहिलवानचा मुलगा नदीम ( पूर्ण नाव माहीत नेण्याची नाही ) रा . झेंडी गेट नगर म्हणाला की , कयुब तुझ्या घरात लपून बसला आहे.

तेव्हा तरुणी म्हणाली की , तो घरात नाही , असे म्हणाल्याचा राग आल्याने तरुणीस धरुन , ओढून लज्जा उत्पन्न होईल , असे वर्तन करुन विनयभंग केला.

मैत्रिण सोडविण्यास आली असता तिचेही कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला व म्हणाला की , आता फक्त कपडे फाडले आहे . पुढच्यावेळी उचलून घेवून जाईल , असा दम दिला.

पिडीत तरुणीच्या मैत्रिणीच्या फिर्यादीवरुन आरोपी नज्जू पहिलवानचा मुलगा नदीम ( पूर्ण नाव माहीत नाही ) याच्याविरुद्ध तोफखाना पोलिसात भादवि कलम ३५४ , ३५४ अ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .

रात्री ११ . ४५ वा . हा प्रकार घडला . पोनि मुलानी यांनी घटनास्थळी भेट दिली . हेकॉ येरुळकर हे पुढील तपास करीत आहेत . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button