Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

बुलढाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

बुलढाणा, (जिमाका) दि. 4 : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत 24 रूग्ण बाधित केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली.

त्यामुळे जिल्ह्यात कोरोना निवळण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. आज चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.

जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधित रूग्ण आढळले होते.

त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील दोन, मलकापूर येथील चार,  दे.राजा येथील दोन आणि सिंदखेड राजा येथील एक कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

त्यामध्ये आज एका रूग्णाची  भर पडली आहे. आज चिखली येथील एक रूग्ण बरा होऊन स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण 20 रूग्ण बरे झालेले आहे.

प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

त्याला आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णाचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने चिखली येथील एका रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

या कोरोनाबाधित रूग्णांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वॉर्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले.

कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला.

दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.

त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 20 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 24 रूग्ण बाधीत होते.

आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्या 20 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता 3 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये.

चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.