Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि. 4: पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे.

तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 2 हजार 364 बाधित रुग्ण असून 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 2 हजार 103 बाधित रुग्ण असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात 78 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 135 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात 34 बाधित रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात 14 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 103 झाली आहे. 499 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 489 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

आजपर्यत विभागात 23 हजार 942 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी  22 हजार 823 चा अहवाल प्राप्त आहे.

1 हजार 119 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी  20 हजार 393  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  2 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 71 लाख 40 हजार 436 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 65 हजार 967 व्यक्तींची तपासणी केली आहे.

त्यापैकी 1 हजार 618 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी  संदर्भित करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.