राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी होणार सुरु !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे.

त्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. त्यावरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात मॉल्स वगळता, इतर सर्व प्रकारचे दुकाने सुरू करण्यास मुभा दिली आहे.

त्यामुळे अनेक दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. मनपा, नगरपालिका हद्दीतील जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांसह एकल वसाहती लगत असतणारी निवासी संकूलातील सर्व दुकाने सुरू राहतील

तथापि, अशा भागात एखाद्या गल्लीत/रस्त्यालगत 5 पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारीच दुकाने सुरू राहतील.

सर्व दुकानांमध्ये सामाजिक अंतर तत्वाचे पालन करावे गलागणार आहे. सलून दुकाने बंदच राहणार आहेत. रिक्षा वाहतूक व खासगी प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment