बिअर बारमालकाची गळफास घेत आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  औरंगाबादच्या पुंडलिकनगरातील रहिवासी प्रसिध्द बिअर बार मालकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

पोटाच्या आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलसांनी व्यक्त केला आहे. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगरमधील शैलेश बिअर बारचे मालक अशोक पांडुरंग जाधव (५९) यांनी रविवारी रात्री परिवारासह जेवण घेतले.

त्यानंतर त्यांनी रात्री दोनच्या सुमारास इमारतीच्या टॉवरवर दोरीने गळफास घेतला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी पाणी भरण्यासाठी उठली असता हा प्रकार समोर आला.

नातेवाइकांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने अशोक जाधव यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या बाबत पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे हिंगे पाटील यांनी सांगितले, की अशोक जाधव यांना पोटाचा आजार होता. त्या आजारामुळे ते नेहमी तणावात राहत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment