Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar South

अहमदनगर जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे जिल्‍हयात अडकलेल्या स्थलांतरित आणि इतर नागरिकांचे महाराष्‍ट्र राज्‍यांतर्गत इतर जिल्‍हयामध्‍ये जाण्‍यासाठी मोठया प्रमाणावर अर्ज प्राप्‍त होत आहे.

या अर्जाच्‍या परवानगीसाठी तहसिलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक यांना त्‍यांचे कार्यक्षेत्रात महाराष्‍ट्र राज्‍यांतर्गत इतर जिल्‍हयामध्‍ये जाण्‍यासाठी प्राप्‍त होणा-या अर्जावर तात्‍काळ निर्णय घेऊन कार्यवाहीसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.

त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार, श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, तहसिलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक यांनी त्‍यांचे कार्यक्षेत्रातील प्रवाशांसाठी Annexure A निर्गमित करण्‍यापुर्वी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे. त्‍यांचे कार्यक्षेत्रात प्राप्‍त होणा-या अर्जानुसार जिल्‍हानिहाय यादया तयार कराव्‍यात.

अशा सर्व व्‍यक्‍तींची वैदयकिय तपासणी करून वैदयकिय प्रमाणपत्र प्राप्‍त करून संबंधीत व्‍यक्‍तीकडे देण्‍याचे नियोजन करावे. अशा प्रवाशांना ज्‍या जिल्हयात जायचे आहे त्‍या जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी अथवा प्राधिकृत अधिकारी यांची आवश्‍यक ती परवानगी असल्‍याची खात्री करावी.

ज्‍या प्रवाशांना जाण्‍यासाठी स्‍वतःच्‍या वाहनांची व्‍यवस्‍था नसेल अशा परिस्थितीत संबंधीत आगार व्‍यवस्‍थापक महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन, मंडळ यांचेशी समन्‍वय साधून अशा प्रवाशांना संबंधीत जिल्‍हयात पाठविण्‍यासाठी बसेसची व्‍यवस्‍था करावी.

प्रवासी बसेसचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टंसिंगसह प्रवासी व्‍यक्‍तींची आसन व्‍यवस्‍था इ. बाबींची सुयोग्‍य खात्री करून बसेस रवाना करण्‍याची कार्यवाही करावी.

अडकलेले मजूर, भाविक, विदयार्थी, पर्यटक यांना अशा प्रकारच्‍या वाहतूकीसाठी प्राधान्‍य दयावे. कुठल्‍याही परिस्थितीत वैयक्तिक पासेस देण्‍यात येवू नयेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button