आता पोल्ट्री व्यवसायिकांना सुगीचे दिवस येणार ! 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- चिकन तसेच अंड्डयांना मागणी वाढत चालली आहे. सध्या उत्पादन कमी असल्याने हे दर अधिक वाढण्याची शक्­यता आहे. चिकनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो, या गैरसमजाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला.

भीतीपोटी चिकन खाणाऱ्यांची संख्या रोडावली होती परिणामी विक्रेत्यांनी दर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला परंतू तो निष्फळ ठरला.

सोशल मीडियाच्या गैरसमजाच्या लाटेत पोल्ट्री उद्योग अक्षरश: उद्ध्वस्त झाला.पोल्ट्रीधारकांवर एक कोंबडी दहा ते वीस रुपयांना विकण्याची वेळ आली.

काहींनी तर आठवडी बाजारात फुकटच कोंबड्यांची विक्री केली, काहींनी जंगलात सोडून दिल्या. यामुळे पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचे उत्पादन जवळपास बंद झाले.

लॉकडाऊन काळात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने मटणाची तुरळक विक्री सुरू आहे. परिणामी चिकन खाण्याकडे मासाहारीचा कल दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात चिकनची १२० रुपये किलो दराने विक्री सुरू होती. हळूहळू हा दर वाढत आता पूर्वीप्रमाणेच १८० रुपयांवर स्थिरावला आहे. यामध्ये पुन्हा दर वाढण्याची शक्­यता चिकन विक्रेत्यांनी वर्तवली असून यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना सुगीचे दिवस येणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment