Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : बियरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, तळीरामांची चांदी झाली

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे बियरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला आहे.रांगा लावून दारू घ्यावी लागत असताना राहुरीच्या तळीरामांची चांदी झाली आहे.

राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली.

वेळीचपोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्या ऐवजी लाठीचा प्रसाद मिळाला. नगरवरून कोल्हारच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो मधुन  बियरची वाहतुक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने  टेम्पो रस्त्यावर पलटी झाला.

या घटनेची माहिती  वाऱ्यासारखी पसरताच तळीरामांनी बियरच्या बाँटल गोळा करण्यासाठी  एकच गर्दी केली. जाणाऱ्या  येणाऱ्या  प्रवाशांसह स्थानिकांनी बियरच्या बाँटल गोळा करुन  घरी नेल्या.

लॉगडाऊन काळात बियरबार व शॉपी बंद होत्या मंगळवारी काही वेळ वाइन शॉप खुले झाले पण गर्दी लक्ष्यात घेता प्रशासनाने लागलीच सील केले. मात्र आज बियरचा टेम्पो प्लटी झाल्याने गुहा परिसरातील अनेकांनी हात मारला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.