Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल होतेय कोरोनामुक्तीकडे !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आरोग्य यंत्रणेला मोठे यश आले असून काल मंगळवारी जामखेड येथील दोन व नेवासा येथील एकाची कोरोनामुक्ती झाल्यानंतर

आज पुन्हा जामखेड येथील दोन तर संगमनेर येथील चार जणांना कोरोनातून मुक्ती झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचा आकडा 34 एवढा झाला आहे.

आता एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 8 रुग्णांवर आरोग्य यंत्रणेचे उपचार सुरु आहेत. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नागरिकांमधून जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचे कौतूक होत आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी 16 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

उर्वरित 04 अहवालांची प्रतीक्षा आहे. या 16 अहवालांमध्ये जामखेड येथील 05, संगमनेर येथील 04, श्रीरामपूर, आष्टी (बीड), पारनेर, नेवासा, राहुरी, कोपरगाव, अहमदनगर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

कोरोना बाधित असलेल्या जामखेड येथील दोन तर संगमनेर येथील चार जणांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 असून त्यापैकी आता तब्बल 34 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज अहवाल निगेटिव्ह आलेल्या जामखेड येथील दोन तर संगमनेर येथील चार जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणेच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button