अहमदनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, वडीलांसह तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.सावत्र वडिलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय.

अहमदनगर शहरातील चेतना कॉलनी येथे एका नराधम सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला शिवाय एका अल्पवयीन तरुणाने ही लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला.

महिला बाहेर नाही तर घरात सुद्धा सुरक्षित नाहीत हे पुन्हा या प्रकरणामुळे सिद्ध झाले आहे.याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर तिचा सावत्र बाप असलेला आरोपी याने मनाविरुद्ध सह्याद्री चौक परिसरातील एका ऑफिसात बलात्कार केला,

तसेच आंधळे – चौरे कॉलनी नवनागापूर या भागात त्रिभुवन नावाच्या इसमाच्या घरात अल्पवयीन तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला .

जानेवारी २०२० ते ते मे २०२० दरम्यान हा अत्याचार झाल्याचे पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment