Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अहमदनगर शहराचे माजी आमदार जातीय तेढ निर्माण करत आहेत !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- शहराचे माजी आमदार लॉक डाऊन काळात रमजान महिन्यात एका वेळेस आजान देण्याच्या परवानगीच्या मुद्दयास जातीयवादी रंग देऊन समाजामध्ये द्वेष पसरवीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी केला आहे.

तर एकीकडे शिवसेनेचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाच्या संकटकाळात कडवी झुंज देत असताना, शहरात मात्र शिवसेनेचे माजी आमदार अजूनही जातीयवादी राजकारणात अडकल्याचा अनिल राठोड यांचा नांव न घेता त्यांच्यावर निशाना साधला आहे.

शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व समाजबांधव कटिबध्द असून, मुस्लिम समाज देखील शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करीत आहे. शहर सध्या ऑरेंज झोनमध्ये असून, काही प्रमाणात सवलती मिळत आहेत. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु असून, देखील मशिदी बंद आहेत. मुस्लिम बांधव उपवास करुन नमाज पठण घरीच करीत आहे.

उपवास सोडण्याची वेळ समाजावी म्हणून मोजक्याच मशिदीतून आजानला परवानगी देण्यात आली असून, मशिदीत फक्त एक व्यक्ती आजान देत आहे. आजाननंतर कोणीही मशिदीत न जाता घरीच नमाज पठण करत असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन समाजात जातीय तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम आजपर्यंत माजी आमदारांनी केले आहे. विकसाचे व्हिजन नसल्याने दोन समाजात दुफळी निर्माण करणे हा त्यांचा राजकीय वारसा असल्याने त्यांना मागील दोन निवडणुकीत घरी बसण्याची वेळ आली. प्रत्येक मुद्दयाला जातीय रंग देण्याची त्यांची जुनी सवय आहे.

कोरोना विषाणू हा संपर्कात आल्याने वाढतो. आजानमुळे हवेतून त्याचा प्रसार होत नसून, अत्यंत बालिशपणाचे मुद्दे मांडून प्रशासन व नगरकरांच्या भावनेशी ते खेळत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन शिवसेनेचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाच्या संकटकाळात कडवी झुंज देत आहे.

प्रत्येक महाराष्ट्रातील मुस्लिम त्यांचा आदर करत असून, त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत देखील करीत आहे. मात्र हे शिवसेनेचे माजी आमदार अजूनही जातीयवादी राजकारणात अडकल्याचे खेद वाटत आहे.

त्यांच्या कार्यकाळात झालेल्या जातीय दंगलीला देखील ते जबाबदार होते. मतदारांचे तोंड पाहून मदत पाठविणार्‍या या पुढार्‍याची ऑडीओ क्लिपने देखील पोलखोल झाली असून, शिवसेनेचे उपनेते म्हणवून घेणारे ते पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वागत नाही.

ते नेहमीच वादग्रस्त ठरत असून, अशा तथाकथित पुढर्‍याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आंम्ही निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.