Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

पुणे विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे : विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ हजार ५७४ झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ७६४ आहेत.

विभागात कोरोनाबाधित एकूण १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९३ रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील २ हजार २८७ बाधित रुग्ण असून ६०८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या  १ हजार ५५५ आहे.

कोरोनाबाधित एकूण १२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८६ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यात ९२ बाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात १४५ बाधित रुग्ण असून ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात ३५ बाधित रुग्ण असून १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात १५ बाधित रुग्ण  असून  १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण २६ हजार ३२६ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी २५ हजार ४ चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १ हजार ३२२ नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे.

प्राप्त अहवालांपैकी २२ हजार १०६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून २ हजार ५७४ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील ७८ लाख ९४ हजार ८३० घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ३ कोटी १२ लाख ९६ हजार ४६५ व्यक्तींची तपासणी केली आहे.

त्यापैकी एका व्यक्तीला अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.