Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

…म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यालाच केले क्वारंटाईन!

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- सुट्टीच्या दिवशी नाशिक येथे जाऊन पुन्हा नगरला आल्यामुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दीपक हॉस्पिटल येथे त्या अधिकाऱ्याला 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत. जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला क्वारंटाईन केले जात आहे.

एक तहसीलदार दर्जाचे अधिकारी रविवारी सुट्टीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात गेले होते. ही बाब जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा समजताच संबंधित अधिकाऱ्याला इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले आहे.

त्यानुसार सदर अधिकाऱ्याला दीपक हॉस्पिटल येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यालाच जिल्ह्याच्या बाहेरून आल्यामुळे क्वारंटाईन केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरून येणारे सर्व अलर्ट झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Get real time updates directly on you device, subscribe now.