अहमदनगर ब्रेकिंग : घरगुती वादातून तरुणाची हत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- घरगुती वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर अली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथे काल रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली.

याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिसात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत मयूर आकाश काळे (वय २७ वर्षे)

हा मुठेवाडगाव येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होता.

त्याचे त्याच्या सासऱ्या बरोबर कोणत्यातरी अज्ञात कारणावरून वाद सुरू होते,

त्या वादातून काल दि.७ रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेदरम्यान ही घटना घडली.

याबाबत मयताची पत्नी मोनिका मयूर काळे हिच्या फिर्यादीवरून

आरोपी सचिन काळे, संदीप काळे, सुरज काळे (सर्व रा.भेंडाळा ता.गंगापुर) व बुंदी भोसले (रा.मिरजगाव ता.कर्जत)

या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

Leave a Comment