वकिलांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करा ‘या’ वकिलांची खंडपीठात याचिका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- कोरोनामुळे वकिलांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे वकिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी याचिका नेवासा येथील वकिलांनी केली आहे.

कोरोनामुळे दोन महिन्यांपासून लॉकडाउनदरम्यान सर्व न्यायालये बंद आहेत. त्यामुळे वकिलांवरही उपासमारीची वेळ आली आहे. वकिलांना कोणतेही आर्थिक संरक्षण नाही,

तसेच पुढील सहा महिने तरी त्यांना पक्षकारांकडून फी मिळण्याची शाश्वती नाही. या सर्व बाबींचा विचार करून गरजू व कनिष्ठ वकिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी.

महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, तसेच राज्य सरकारने ही मदत करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. लॉकडाउन झाल्यापासून न्यायालये बंद असल्याने, ज्युनिअर वकील आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

त्यांना सरकार आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने आर्थिक मदत करावी, यासाठी ही याचिका दाखल केल्याचे अॅड. वसंत नवले यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment