सावधान! आता सेक्समुळे होऊ शकतो कोरोना; शास्त्रज्ञ म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- कोरोनाने नागरिकांना जेरीस आणले आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींद्वारे कोरोना पसरतो हे माहित असल्याने लोक अनेक गोष्टी करण्यापासून दूर राहू लागले आहेत. परंतु आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते. पुरुषांच्या स्पर्ममध्ये शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरस सापडला आहे.

त्यामुळे चीनमध्ये निरोगी रुग्णांनाही शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. चीनच्या शांगक्यू या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 38 पुरुषांना कोरोनाची लक्षणे नव्हती.

यांपैकी 6 जणांच्या स्पर्ममध्ये कोरोनाव्हायरस आढळून आला. या 6 रुग्णांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते निरोगी झाले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या स्पर्ममध्ये पुन्हा कोरोना आढळून आला.

दरम्यान चीनच्या शास्त्रज्ञांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप याबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहेत. चीनमधील तज्ज्ञांनी अशी शक्यता वर्तवली आहे की,

कोरोना संक्रमित पुरुषांसोबत सेक्स केल्यानंतर व्हायरस पसरण्याचा धोका असू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज नाही.

तरी शारीरिक संबंध ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यामध्ये कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणंही असतील तरी जोडीदाराला त्याची लागण होऊ शकते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment