Maharashtra

तामिळनाडूतील ४८० जणांना घेऊन एसटीच्या १६ बस रवाना

सांगली, दि. 8 (जिमाका) : लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील 480 जणांना घेऊन एस.टी  महामंडळाच्या 16 बस रवाना झाल्या.

यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अवर्णनीय होता. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी याच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तींना सेलमतामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली.

महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वाना खाण्यासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देऊन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

सांगलीमध्ये लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथील सुमारे 480 जण अडकले होती. ते एमआयडीसी सांगली/ कुपवाड मध्ये विविध ठिकाणी कामधंदा करत होती.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आपआपल्या गावी जाण्यासाठी ते एकत्र जमले परंतु त्यांना परत त्यांच्या सांगली येथील निवासाच्या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिका यांनी परत पाठविले.

आज पर्यत प्रशासनाने त्यांचे जेवण खाण्याची सोय केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न केल्यामुळे सदर व्यक्तींना सेलम तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली .

सर्वांची वैद्यकीय तपासणी करून ते कोविड सदृश आजार नसल्याची तपासणी करून महसूल यंत्रणेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत एसटीच्या 16 बसने तामिळनाडू राज्यातील सेलम येथील 480 जणांना रवाना केले.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close