अहमदनगर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी दोन दिवसांत झाले ‘एवढे’ अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रोज हजारो अर्ज येत आहेत.

दोनच दिवसांत २ हजार १०० जणांचे इतर अहमदनगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज आले होते.

जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.

या कक्षामध्ये रोज हजारोंच्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. मुलाकडे जायचे आहे, घरातील व्यक्ती आजारी आहे, दुसऱ्या जिल्ह्यातील दवाखान्यात उपचार सुरू आहेत, कंपनी सुरू झाली असून पुन्हा कामावर हजर व्हायचे आहे,

अशी विविध कारणे देत परवानगी मिळावी, यासाठी अर्ज येत आहेत; मात्र, ज्यांचे कारण अत्यावश्यक आहे, अशाच नागरिकांचे अर्ज मंजूर करण्यात येत असून त्यांना इतर जिल्ह्यांत जाण्यास परवानगी दिली जात आहे.

अनावश्यक कारण देणाऱ्यांचे अर्ज प्रशासनाकडून नाकारण्यात येत आहेत. नाकारल्यानंतरसुद्धा काही जण पुन्हा अर्ज करीत असल्यामुळे दैनंदिन अर्जांची संख्या वाढतच आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment