अहमदनगर जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार गारांचा पाऊस,वीज पडून एक जखमी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जामखेडमध्ये वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला.

नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून शेतकरी राजेंद जाधव (वय ६४) हे जखमी झाल्याची दुर्घटना घडली.

यात ते जखमी झाले आहेत. त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील शिऊर, सावरगाव, कुसडगाव, झिक्री, नान्नज, दैवदैठण, हळगाव, नायगाव, धोंडपारगाव, पाडळी, नाहुली, पाटोदा परिसरात गारांसह पाऊस पडला.

या पावसामुळे फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. विजेच्या तारा पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment