कोरोनावर भारताने बनविली लस ? प्राण्यांवर होणार ट्रायल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. सर्व उपाययोजना करूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. संपूर्ण जग यावर लास शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतानं महत्त्वाची पावलं उचलली असून, त्याची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर घेण्यात येणार आहे. अनेक देशातील वैज्ञानिक कोरोनावरची लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.

भारतही कोरोनावर लस तयार करण्याच्या फक्त एक पाऊल दूर असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहकार्याने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशभरात कोरोनावर लस तयार करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे.

या दोन्ही संस्था कोरोनावरची लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी पुण्यातील लॅबमधून कोरोना व्हायरस स्ट्रेन्स भारत बायोटेकला पाठविण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लस तयार झाल्यानंतर प्रथम तिची चाचणी प्राण्यांवर केली जाणार आहे. त्यानंतर मानवांवर त्याचा प्रयोग केला जाईल.

Leave a Comment