Ahmednagar NewsAhmednagar SouthCrime

पुण्याहून विनापरवानगी आल्याने चौघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-सध्या कोरोना विषाणूचा प्रार्दभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चाल असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो हे माहीत असतानाही

पुणे ते राहरी असा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता विनापरवाना प्रवास केला म्हणून चौघांविरुद्ध राहरी पोलिसात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघाही आरोपींना गाडगे महाराज आश्रम राहरी येथे क्वॉरंटाईन करण्यात आले . पोकॉ प्रविण अहिरे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रमोद सुखलाल बोरा , सुनिता प्रमोद बोरा , सलोनीप्रमोद बोरा , दर्शन प्रमोद बोरा ,

सर्व रा . निसर्ग अपार्टमेंट , रुम न . ६ , स्टेशन रोड राहुरी यांच्याविरुद्ध भादवि कलम २६९ , २७० , २९० , १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ( ४ ) प्रमाणे गुरनं . ३३९ दाखल करण्यात आला.

घटनास्थळी पोनि देशमुख , पोसई शेळके यांनी भेट दिली . पोना दिवटे हे पुढील तपास करीत आहेत , अशी माहिती राहरी पोलीस सूत्रांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button