१०० मीटर अंतरावर थांबली मालगाड़ी आणि रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे पुणे-दौंड रेल्वे मार्गावर उरळी-लोणी स्थानकादरम्यान चालाकाच्या प्रसंगावधानतेमुळे 40 लोकांचे प्राण वाचले आहेत.

हे 40 लोक रेल्वे ट्रॅकवरून पायी निघाले होते. परंतु मालगाडीच्या ‘लोको पायलट’च्या (चालक) लक्षात आल्याने प्रसंगावधान दाखवून त्याने गाडी थांबवली. त्या वेळी गाडी आणि लोकांमध्ये केवळ १०० मीटर अंतर उरले होते.

त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली. जालना येथून औरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मजुरांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच अगदी तशीच घटना शुक्रवारी सायंकाळी पुण्यात घडली असती.

मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्या घटनेची पुनरावृत्ती टळली. उरळी आणि लोणी रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी सायंकाळी काही लोक रेल्वे ट्रॅकवर चालत होते.

त्यातील काही लोक सामानासह ट्रॅकवर बसले होते, तर काही जण सामान घेऊन चालत होते. त्या वेळी उरळीकडून पुण्याच्या दिशेला एक मालगाडी चालली होती. या मालगाडीच्या ‘लोको पायलट’ला मार्गावरून चालणारे लोक दिसले.

त्याने प्रसंगावधान दाखवून हॉर्न वाजवला आणि त्या लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. गाडीचे इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली. त्यामुळे मालगाडी या लोकांपासून सुमारे १०० मीटर अलीकडे थांबवता आली.

Leave a Comment