अहमदनगर ब्रेकिंग : शेतीच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून खून !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा भरदिवसा खून झाला. सतीश छबू यादव (३६ वर्षे) असे मृताचे नाव आहे.

रविवारी दुपारी अडीच-तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष यादव यांना दुपारच्या वेळी घरातून बोलावून घेत शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली.

डोक्यात कुऱ्हाड घातल्याने ते जबर जखमी झाले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

याप्रकरणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या रिपोर्टनुसार लोणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतीच्या वादातून ही घटना घडली आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment