Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : कुऱ्हाडीने खून करणाऱ्या आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुऱ्हाड घालून सतीष छबू यादव (वय ३६) या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवीत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून गोरख संपत यादव (वय ३९) यास अटक केली. आरोपीस न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली.

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष छबू यादव यास दुपारच्यावेळी घरातून बोलावून घेत पूर्ववैमनस्यातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुऱ्हाड घालत सतीष यादव यास जबर जखमी करण्यात आले.

प्रकाश माधव यादव यांच्या यादववस्ती येथील राहत्या घरासमोर ही रविवारी भरदुपारी ही खुनाची घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेत सतीश यादव यास उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र तत्पूर्वीच सतीष यादव यांचा मृत्यू झाला होता. या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली.

आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर पथकाने रात्रीच आरोपी गोरख संपत यादव (रा. कौठेकमळेश्वर) यास कोकणगाव येथून ताब्यात घेत अटक केली.

याप्रकरणी मयत सतीष यादव याचे वडील छबु यादव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी गोरख यादव याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा या घटनेत संबंध नव्हता.

आरोपी गोरख संपत यादव याने डोक्यात कुऱ्हाड मारल्याने सतीश यादव याचा मृत्यू झाला. फिर्यादीतही एकाच आरोपीचे नाव असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अन्य व्यक्तींवरील खुनाच्या आरोपाचे बालंट टळले. त्यामुळे संबंधितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:100px;max-height:100px;" data-ad-client="ca-pub-9385025845051934" data-ad-slot="7365815203" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button