अहमदनगर जिल्हा लवकरच ग्रीन झोनमध्ये !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली आहे.रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांची तातडीने तपासणी, रुग्ण आढळलेला परिसर तातडीने सील करणे,

तसेच बाधित व्यक्तीचा इतरांशी संपर्क तोडणे या जिल्हा प्रशासनाने केलेल्या त्रिसूत्री उपाययोजनांमुळे जिल्हा ग्रीनझोनकडे वाटचाल करत आहे.

या तीन प्रमुख उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा नगर आहे. राज्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणूनही नगरची ओळख आहे.

बहुतांशी रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. जामखेड, श्रीरामपूर व संगमनेर तालुक्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दोन जणांचे अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ५३ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४० जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. रविवारी एकाला घरी सोडण्यात आले होते. सोमवारी आणखी चाैघांना सोडण्यात आले.

सध्या १० जणांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण हे चार दिवसांपूर्वी संगमनेर येथे आढळले आहेत. आतापर्यंत एकूण १७५० व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १६५८ स्त्राव निगेटिव्ह आले आहेत.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्यामुळे नगर जिल्हा लवकरच ग्रीन झोनमध्ये जाईल. बाधित रुग्णाचा संपर्क तोडणे, संबंधित परिसर सील करणे व बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची चाचणी करणे यामुळे बऱ्याच प्रमाणात संसर्ग रोखण्यात यश आले.” राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment