हवामान विभागाकडून भारतीयांना खुशखबर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- मान्सून येत्या शनिवार (दि.१६ मे)पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

त्यामुळे भारतातही त्याचे आगमन लवकर होण्याचा अंदाज आहे, अशी खुशखबर हवामान विभागाने दिली आहे. तसेच, यंदाचा मान्सून हा सरासरी इतका राहणार आहे.

अंदमानात मान्सून साधारणपणे २० मेच्या आसपास दाखल होतो. त्यानंतर १० दिवसानंतर तो केरळात येतो. सध्या अंदमानच्या आसपास मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे.

त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यंदाचा मान्सून हा सरासरी इतका राहणार असल्याचा अंदाज यापूर्वी हवामान विभागाने वर्तविला आहे. अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण अंदमानचा समुद्र आणि सुमात्राच्या समुद्राच्या दरम्यान हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment