Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingPolitics

‘या’ तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांची मोठे नुकसान

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- रविवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने कर्जतसह तालुक्यातील कुळधरण, राशीन परिसरात शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे यात मोठे नुकसान झाले आहे.आमदार रोहित पवार यांनी परिसराची पाहणी केली आहे.

कुळधरण परिसरातील पिंपळवाडी, राक्षसवाडीसह तालुक्यातील सोनाळवाडी, तोरकडवाडीत फळबागा व पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकसान झालेल्या पिकांची सोमवारी (११ मे) पाहणी केली व दिलासा दिला.

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी तहसीलदार छगन वाघ, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, सरपंच शाम कानगुडे, उपसरपंच शंकर देशमुख, सरपंच बाळासाहेब काळे, दादा परदेशी, रमेश परदेशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार अधिकाऱ्यांसह सकाळीच मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.

पवारांनी कोळवडी, बेनवडी, तोरकडवाडी, सोनाळवाडी, पिंपळवाडी आदी गावांमधील नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली. अचानक झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, लिंबु, द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील राक्षसवाडी (बुद्रुक), धालवडी, तळवडी, सुपे आदी भागातील पिकांचेही नुकसान झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी सकाळपासूनच मतदारसंघातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडून पिकांची भरपाई मिळवून देऊ, असा शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button