Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

0

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा नजीक असलेल्या ओढ्यात आज सकाळी १० च्या सुमारास शहरातील हेमंत नंदकुमार कुसळकर (२०) या तरुणांचा पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

यावेळी नेवासा पोलिस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, पोलीस हवालदार तुळशीराम गिते यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.

शवविच्छेदनसाठी मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

li