Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार,मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण !

0

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार करत मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील आनंदवाडी परिसरात राहणारी एक १७ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी घरात एकटी असताना काल संध्याकाळी आरोपी संतोष बिराजी खरात हा घरात घुसला,

तरूणीला बळजबरी करुन तिच्यावर अत्याचार केला.आरडाओरड केल्याने तरुणीचे वडील आले असता त्यांना काठीने मारले व आरोपी संतोष खरात हा त्याच्या नातेवाईकांना घेवून आला.

त्यांनी सत्तू, तलवार, कुऱ्हाडीने पिडीत तरुणीचे वडील व नातेवाईकांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत विद्यार्थिनीने कर्जत पोलिसात फिर्याद दिल्यावरुन

बलात्कार करणारा आरोपी आरोपी संतोष बिराजी खरात तसेच मारहाण करणारे आरोपी कुंदन खरात, महादु विठ्ठल खरात, महादू खरात याचा मुलगा, (नाव माहीत नाही) धुळाजी पांडुरंग खरात व इतर १६ सर्व | रा. आनंदवाडी यांच्याविरुद्ध –

भादवि कलम ३७६, ३५४, ४५२, १४३, १४७, १४८, १८८, ५०४, ५०६ बालकांचे लेंगिक अत्याचारापासून संरक्षण, पोस्को कायदा कलम ३, ४. आर्म अँक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी कर्जत पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

li